मेळाव्याची सुरवात महाराष्ट्र गीताने झाली. राज आणि उद्धव यांनी एकत्रित छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बंधूंनो मातांनो भागणींनो." अशी केली.
यावेळी राज ठाकरे बोलताना म्हटले की कोणत्याही भांडणां आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.
यावेळी भाषणात आक्रमक होत राज म्हणाले, हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न हा मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याच्या डावाचा भाग आहे. भाषेला हात लावून प्रतिक्रिया बघायची होती असेही राज ठाकरे म्हणाले.
तसेच या वेळी त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी मराठी माणसाचा संयमाची परीक्षा घेऊ नये असा इशारा दिला.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशी केली. तसेच आज राज आणि मी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल परंतु आमच्या भाषणापेक्षा आम्ही एकत्र दिसणं महत्वाचं आहे असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात राजकीय युतीवर सूचक विधान केलं ते म्हणाले आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. मुंबई महापालिका निवडणूक समोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे पक्ष राजकीय दृष्ट्या एकत्र येतायेत का हे येणार काळातच समजेल. परंतु उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केल्याने ठाकरे ब्रँड एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी माणसाचा विजयी मेळावा
महाराष्ट्रात पहिली पासून हिंदी भाषा सक्ती निर्णय घेण्यात आला होता. याचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे पक्ष यांनी एकत्रित मेळाव्याची घोषणा केल्यावर राज्य सरकार नरमले आणि हिंदी सक्तीचे दोन जी आर रद्द केले.
मराठीमाणसाचा आणि एकजुटीचा हा विजय साजरा करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ५ जुलै रोजी वरळी डोम येथे विजयी मेळावा आयोजित केला आहे.