हे आंदोलन मुंबई मराठी पत्रकार संघासमोर होणार असून या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे वरिष्ठ नेते सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलनाची वेळ दुपारी ३ वाजता आहे.
https://www.instagram.com/p/DLehDSzzRNr/?igsh=MWNrcWJvbHp6MmFpdg==
हिंदी भाषा सक्ती वरून देशभरात वातावरण तापत आहे विशेष करून दक्षिण भारतात याचा जास्त विरोध दिसत आहे. सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची या मुद्द्यावर राजकीय कोंडी होताना दिसत आहे.
तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीय पटलावर एकत्र येण्याची ही नांदी असल्याचं बोलल जात आहे. तसे झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकीत हा मोठा फॅक्टर असेल असा राजकीय विश्लेषकांच मत आहे.
दोन्ही ठाकरेंची एकी महायुतीसाठी मुंबई महापालिका निवडणुकीत डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तसेच भाजपचे मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्नही भंग होऊ शकते असा कयास लावला जात आहे.